तत्सम बरोबर काम करणं हा अत्यंत समाधानकारक अनुभव होता. डॅा मृणाल धोंगडे या तपशिलवार विचार करून, काय शक्य / नाही ते बघून लागणारा वेळ ठरवतात आणि मग त्या वेळात जागरूकपणे आपल्या संघाकडून काम पूर्ण करून देतात. आणि जेवढ्यास तेवढं असा हिशोबी व्यवहार न ठेवता आपल्याला योग्य ते सल्ले देणं, काही नजरेतून सुटणाऱ्या बाबी लक्षात आणून देणं ह्या ही गोष्टी त्या करतात. त्यामुळे आपण इतर कुणाला काम दिलंय असं न वाटता आपण आपल्याच सहकाऱ्यांबरोबर काम करतो आहोत असा अनुभव येतो. हे तत्समचं वेगळेपण आहे.
डॅा नीतीन मोरे
सीईओ, ब्रेनायन